अस्तित्वाचा शोध घेणारा सुपुत्र चे यशस्वी 25 वर्ष पूर्ण
रस्त्यावर बाबासाहेब जयंती दिनी भिखारी महिलेच्या हस्ते सुरुवात केली
विशेष संपादकीय
अस्तित्वाचा शोध घेणारा सुपुत्र चे यशस्वी 25 वर्ष पूर्ण...
लातूर सारख्या ठिकाणी एम ए इंग्रजी या विषयाचं शिक्षण घेत असताना एक गोष्ट लक्षात आली की समाजामध्ये आपल्या विचाराची, आई वडिलांवर प्रेम करणाऱ्यांची, एकत्र कुटुंब कुटुंब कुटुंब पद्धती अस्तित्वात ठेवण्यासाठी, एक प्रभावी माध्यम असलं पाहिजे असा विचार माझ्या मनात आला. आणि 14 एप्रिल 1996 रस्त्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लातूर मध्ये एका रस्त्यावरील भिकाऱ्या महिलेच्या हस्ते मी माझ्या अस्तित्वाचा शोध घेणारा सुपुत्र या दैनिकाची सुरुवात केली. त्याचं कारण होतं मी जिथे राहत होतो त्या शेजारी एका व्यक्तीने स्वतःच्या आईला घराबाहेर काढले चे चित्र मी स्वतः पाहिलं, आणि तेव्हा रात्रभर मला झोप आली नाही आणि एकच विचार माझ्या मनात आला. आपला जन्म कुणामुळे झाला? त्याचे उत्तर होतं ज्याच्यामुळे झाला ते आई-वडील . आपले आई-वडील हेच आपले अस्तित्व. म्हणून आपल्या अस्तित्वापासून दूर गेलेल्या भरकटलेल्या मुलांना एक विचार द्यावा हा हेतू लक्षात घेऊन मी ठरवलं दैनिक वृत्तपत्र सुरु करायच, त्याचं नाव काय असावं असा प्रश्न माझ्या मनात पडला आणि स्वतःचं अस्तित्व हे आपले आई-वडील असतात आणि त्याचा विसर समाजातील लोकांना पडलेला आहे असं मला वाटलं म्हणून अस्तित्वाचा शोध घेणारा सुपुत्र हे दैनिक सुरु केलं. सुरुवातीच्या काळात हे दैनिक सुरू करण्यापूर्वी मी वत्सला बळीराम प्रकाशन केंद्र ऑफसेट प्रिंटर्स व्यवसाय सुरू केला . कारण दैनिक वृत्तपत्र छपाई करायचं झाल्यास बाहेरून करणं शक्य नव्हतं. त्यामुळे एम ए .करत असतानाच मी व्यवसायाकडे वळलो.आणि ऑफसेट चे मशीन उद्घाटन मात्र माझ्या पूजनीय वडिलांना निजामाच्या काळामध्ये हैदराबादला शिक्षणासाठी ज्या नी घेऊन गेले ,त्या भाऊराव चींचनसूरे या लिंगायत समाजाच्या व्यक्तीकडून मी माझ्या व्यवसायाची सुरुवात केली.त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांना भर पेरावा आहेर केला.मला आणि माझ्या वडिलांना जो आनंद मिळाला तो व्यक्त करता येत नाही.हे सगळं करण्यासाठी ज्या स्वातंत्र्याची आणि प्रेमाची गरज होती ती म्हणजे माझे मोठे बंधू अनिल कुमार बळीराम गायकवाड अण्णा. यांच्यामुळे शक्य झालं आम्ही तिघे भाऊ परंतु आम्हा तिघांनाही दादांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं ज्यांना ज्यात आवड आहे ते केलं पाहिजे असं दादा आणि अण्णा यांनी सूचित केलं म्हणून मला लिखाणाचा छंद असल्यामुळे, कविता करण्याचा छंद असल्यामुळे ,मी ठरवलं दैनिक सुरू करायचं.पंचवीस वर्ष अखंडित चालू ठेवण हे खूप अवघड काम आहे.आज 26 व्या वर्षात पदार्पण करत असताना मला खूप आनंद झालेला आहे. दैनिक वृत्तपत्र कुठलीही जाहिरात न घेता केवळ शासकीय जाहिराती वरती वृत्तपत्र चालवणे म्हणजे दररोज आत्महत्या करणे.महागाई वाढलेली असतानासुद्धा सातत्य टिकविण्यासाठी वृत्तपत्र चालू ठेवले.काळाच्या बरोबर त्यात बदल केले सध्याचा जमाना हा इंटरनेटचा असल्यामुळे दैनिक सुपुत्र इंटरनेट आवृत्ती आणि न्युज पोर्टल हे सुरू केले. नियमितपणे वृत्तपत्र चालवत असताना मी माझ्या तत्त्वाशी कधीच तडजोड केली नाही माझ्या बुद्धीला जे पटत नाही ते मी कधीच करत नाही.मला एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या विषयाबद्दल जे वाटतं ते स्पष्ट मी माझ्या वृत्तपत्रातून प्रकाशित करत असतो. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानाच्या अधिकारानुसार मला माझं स्वातंत्र्य आहे, लिखाणाचा स्वातंत्र्य आहे,फिरण्याचा स्वातंत्र्य आहे, बोलण्याचा स्वातंत्र्य आहे, व्यवसायाचा स्वातंत्र्य आहे ,या सर्व स्वातंत्र्य मध्ये मी हे वृत्तपत्र नित्यनियमाने चालवत आहे.सांगण्यासारखं खूप काही आहे लिहिण्यासारखे खूप काही आहे पंचवीस वर्षाचा कालावधी हा छोटा नाही.या कालावधीत अनेक चढ-उतार आले माझे पूजनीय पिताजी बळीराम शिवराम गायकवाड हे स्वतः जातीने लक्ष द्यायचे. मला एक प्रसंग आठवतो ऑफसेट प्रिंटिंग साठी प्लेट लागतात.तो प्लेट बनवणारा मुलगा आला नाही माझ्या वडिलांनी म्हणजेच दादांनी प्लेट बनवणाऱ्या माणसाकडे बारकाईने लक्ष देऊन एका कागदावर ती त्याची प्रक्रिया लिहून स्वतः प्लेट बनून दाखवली. माझा पेपर कधी खाडा पडून दिला नाही. मुलगा करतो आहे त्याला मदत केली पाहिजे या भावनेतून दादांनी मला सतत प्रोत्साहन देत गेले. सतत माझा छंद जोपासण्याचे काम पूजनीय दादा पूजनीय यांना यांनी केलं. आईने सुद्धा माझ्या या वृत्तपत्राच्या कामांमध्ये कधीच अडथळा किंवा विरोध केला नाही.हे सगळं करत असताना माझ्या मुंबईत राहत असलेल्या मुला मुली कडे पत्नीकडे मात्र पाहिजे तितका वेळ देता आला नाही ही खंत मात्र नेहमीसाठी असेल.परंतु मला एका गोष्टीचं समाधान आहे ठरवलेलं काम या वृत्तपत्राच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.एकत्र कुटुंब पद्धती ही समाजात राहिली पाहिजे. बहिण भावाचं ,भावाभावांचे प्रेम कायम असलं पाहिजे याला अनुसरून कविता लिखाण लोकांपर्यंत देण्याचं काम माझं सुरूच आहे. आणि ज्या उद्देशाने वृत्तपत्र मी चालू ठेवलं तो उद्देश साकारत असताना, बघता बघता पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत. पहिला अंक सुरू करत असल्या पासून आज पर्यंत 26 व्या वर्षात पदार्पण करत असताना सुद्धा माझ्याकडे जे कर्मचारी होते तेच कर्मचारी आजही काम करत आहेत याचाही मला खूप आनंद आणि समाधान आहे. खाजगी नोकरी मध्ये टिकून राहणं हे सुद्धा एक मोठं जिकरीचं काम आहे तेही पूर्ण झाल्याच दिसत.
दैनिक अस्तित्वाचा शोध घेणारा सुपुत्र चे वाचक आणि माझे मार्गदर्शक यांनी जशी 25 वर्ष साथ दिली तशी भविष्यातील मला साथ द्यावी याच अपेक्षा सह आजच्या या 26 व्या वर्षात पदार्पण करत असलेल्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद.



COMMENTS