मराठी बिग बॉस फेम कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती
मा खा डॉ सुनील बळिराम गायकवाड.
मराठी बिग बॉस फेम कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती
मा खा डॉ सुनील बळिराम गायकवाड.
सलगर ( विकास गायकवाड)
मराठी बिग बॉस फ्रेम प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील यांचा लातूर तालुक्यातील सलगर या गावी प्रचंड मोठा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला खास करून लातूरचे माजी खासदार डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड उपस्थित होते.
अत्यंत कमी वयामध्ये च्या कीर्तनकारांनी आपलं नाव कमावला आहे अशा पैकी एक असलेल्या शिवलीला पाटील या कीर्तनकार आहेत परिवारातील सदस्यांनी कसं राहिलं पाहिजे आई वडिलांवर कसं प्रेम केले पाहिजे सामाजिक सलोखा कसा राहिला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं बाबतीत अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांना समजेल अशा भाषेत त्यांनी आपलं कीर्तन सादर केलं सलगर गाव च्या परिसरातील जवळपास दहा ते पंधरा गावातील महिला आणि पुरुष हजारोच्या संख्येने आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित होते . माजी लोकप्रिय संसद रत्न खासदार सुनील बळीराम गायकवाड यांनी आपल्या खासदारकीच्या निधीतून सलगर गावामध्ये सर्वात मोठे सभामंडप काम केलेले आहे त्यामुळे गावच्या सरपंचाच्या आग्रहाखातर आजच्या किर्तन सोहळ्याला ते उपस्थित राहिले होते. कार्यक्रमासाठी परिसरातील महिलांनी जास्त गर्दी केली होती. कोरोना कालावधीच्या नंतर हजारोच्या संख्येने जाहीर कार्यक्रम होणारा हा या परिसरातील पहिलाच कार्यक्रम होता सामाजिक प्रबोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून कीर्तनाला सुरुवात केलेली आहे अत्यंत लहान वयात त्यांनी सुरुवात केली असल्यामुळे आजचे कीर्तन नाचा क्रमांक हा बारा हजारा पेक्षा पुढंचा होता. सराफ व्यापारी हरिभाऊ गायकवाड, विकास गायकवाड, आणि दैनिक सुपुत्र चे उपसंपादक सिद्धेश्वर विसवेकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.



COMMENTS