पर्यावरण प्रेमी: डॉ अरुण शाह
८२ व्या वाढदिवसानिमित्य कोटी कोटी शुभेच्छा
पर्यावरण प्रेमी: डॉ अरुण शाह
माझा मुलगा शुभम लहानपनी लातूर ला आला होता.लोकसभा ची २००९ ची निवडणूक झालेली होती.त्याच्या समवयस्क मुलाचा इथे त्याच्या सोबत खेळण्यासाठी कोणीतरी मुलगा असावा म्हणून शोध घेतला आणि डॉ पल्लवी सावे चा मुलगा प्रज्वल सोबत शुभम ची मैत्री झाली.. आणि मी नुकताच लोकसभेची निवडणून भारतीय जनता पार्टी कडून लढवली होती. आणि प्रज्वल च्या आजोबाच्या घरी शुभम सोबत जाण्याचा योग आला आणि डॉ अरुण शाह यांची ओळख झाली. डॉ अरुण शाह म्हणजे लातूर नगर परिषद चे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून सेवा निवृत झालेले. पण लातूर च्या राजकारणाची प्रचंड जान असेलेले व्यक्तीमत्व. माझे आणि डॉ अरुण शाह यांचे नाते म्हणजे जनू गुरु शिष्याचे नाते असल्या सारखे झाले. अनेक विषयावर मार्गदर्शन करतात. राजकिय विषय असेल किवा सामाजिक विषय असेल अतिशय चांगले मार्गदर्शन मला नेहमी करत असतात. निस्वार्थ भावनेंनी आमचे संबंध जूडलेले आहेत.निमित्य मात्र माझ्या मुलाच्या मित्राचे आजोबा म्हणून जरी ओळख झाली असली तर ती अनेक वर्षापासून माझ्या परिवाराचा एक भाग असल्या सारखे संबंध आमचे आहेत.मला डॉ अरुण शाह सोबत कुंतलगिरी चा जाण्याचा अनेकदा योग आला. मी खासदार असताना कुंतलगिरी च्या जैन मंदिरात माझा मानपत्र देऊन मोठा सत्कार केला.माझी जेव्हा इच्छा होईल कुंतलगिरी ला जाण्याची तेव्हा त्यानी मला सतत मदत केलेली आहे. मंदिराची सेवा काही प्रमाणात मी करण्याचा प्रयत्न केला.
आमचे अनेक वर्षापासून चे संबंध आणि मी कुठल्या ही विषयावर मार्गदर्शन घेण्यासाठी कधी ही त्यांच्या घरी जात असतो.
डॉ साहेब सेवानिवृत जरी झाले असले तरी ही आणखी फ़ीट आहेत आज ही ते वैद्यकीय सराव करत असतात. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांची घराची बाग बघण्यासारखी आहे मागच्या ५० वर्षापासून आपल्या बंगल्या मधे चारी बाजूनी जे बाग फुलवलेली आहे आणि ती बारा महिने जीवंत ठेवलेली आहे हे मात्र खूप कौतुक करण्या सारखं आहे.
केवळ बाग बगीच्या करुन थांबले नाहीत तर ते अनेक औषधी वनस्पती पण आपल्या अंगनात जोपासली आहे.
वनस्पती शास्त्र चा अभ्यास खूप आहे. त्या वृक्षांची काळजी ते स्वतःच्या लेकरा पेक्षा ज्यास्त घेतात.
खर तर डॉ साहेब माझ्या जन्मा अगोदर दोन वर्ष अगोदर एमबीबीएस झालेले डॉक्टर. सोलापूर चे रहिवासी आणि लातूर ला त्यानी कर्मभूमी बनवली. लातूर नगर परिषद ला आरोग्य अधिकारी म्हणून जॉइन होऊन लातूर नगर परिषद चे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून सेवा निवृत झाले ले डॉ साहेब आज आपला वाढ दिवस आहे २७ फेब २०२३ ला आपणाला ८१ वर्ष पुर्ण होऊन ८२ व्या वर्षात पदार्पण करीत आहात. आपणाला निरोगी दीर्घ आयुष लाभो याच भगवान महावीर चरणी प्रार्थना करतो.
या वयात ही आपला उत्साह आणि काम करण्याची गती पाहता आज च्या तरुण पिढी ला लाजवण्या सारखे काम आहे.
असाच उत्साह कायम राहावा आणि मला आपला सहवास आणि मार्गदर्शन, आशीर्वाद मिळावा याच आशेनी मी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा आपणाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देता.
धन्यवाद
आपला
प्रोफ़ेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड
मा.खासदार,लातूर लोकसभा
COMMENTS